Ad will apear here
Next
सात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित


पुणे : राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचे अग्निशामक  विभाग आणि जागतिक पातळीवर विना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या सेफ किड्स फाउंडेशनने संयुक्तरीत्या शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या सप्ताहांतर्गत हनीवेलतर्फे ‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ अभ्यासक्रमातील आगीपासून सुरक्षित राहण्याचे धडे दिले जातील.

‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ हा १४ वर्षांखालील लहान मुलांबाबत घडणाऱ्या भाजण्याच्या घटना टाळण्यासाठी तयार करण्यात आलेला होम सेफ्टी कार्यक्रम आहे. हनीवेल होमटाऊन सोल्यूशन्स इंडिया फाउंडेशनशी भागिदारीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. कंपनीच्या कॉर्पोरेट सिटीझनशिप उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विस्तृत मार्केट रिसर्चच्या माध्यमातून पुण्यातील चार लाख २५ हजार विद्यार्थी आणि दोन लाख ५० हजार पालकांपर्यंत कटिंग एज, प्रायोगिक आणि मजेदार शैक्षणिक उपकरणांच्या सहाय्याने आगीपासून सुरक्षित राहण्याच्या उपायांची माहिती पुरवण्यात आली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत ३०० मॉडेल फायर सेफ स्कूल्स आणि १०० फायर सेफ कम्युनिटीज तयार करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी आगीच्या प्रसंगी घेण्याच्या आवश्यक त्या खबरदाऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना पुणे अग्निशामक विभागाचे मुख्य फायर ऑफिसर प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘नागरिकांना आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती करून त्यांना अशा घटनांच्यावेळी खबरदारी बाळगण्यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न सुरू राहणार आहेत. आमचा विभाग नेहमीच आगीच्या प्रत्येक घटनेचा मुकाबला करण्यासाठी, तसेच आणीबाणीच्या प्रसंगांसाठी सज्ज असतो. आपत्ती प्रतिबंधक उपायांमुळे नेहमीच विकास आणि शाश्वततेची ग्वाही मिळत असते. यासाठीच गेल्या तीन वर्षांपासून आम्ही शहरातील नागरिकांना आणि प्रामुख्याने मुलांना याबाबत विशेष जागृत बनवत आहोत.’

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य फायर ऑफिसर किरण गावडे म्हणाले, ‘वेगाने होत असणारे नागरीकरण आणि उद्योग, तसेच नागरी वसाहतीत होणार्‍या प्लास्टीकच्या वाढत्या वापरामुळे आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरांना सुरक्षित आणि पर्यावरणाभिमुख बनवण्यासाठी ज्वलनशील वस्तूंचा वापर कमीत कमी करणे खूप महत्त्वाचे आहे.’

राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहांतर्गत १४ ते २० एप्रिल या कालावधीत रॅली, पथनाट्य, प्रदर्शने, आग सुरक्षाविषयक कार्यशाळा, मुलांसाठी कार्निवल्स, मॉल इव्हेंट्स, मॉडेल आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा आदी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यासोबतच सेफ किड्स फाऊंडेशन आणि अग्निशामक विभाग यांच्याकडून शहरातील आगीच्या घटनांवेळी ती शमवण्यासाठी मदत करणार्‍या १५० अग्नी सुरक्षा मित्रांनाही विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

सेफ किड्स फाऊंडेशनचे कार्यक्रम संचालक डॉ. सिंथीया पिंटो म्हणले की, ‘प्रत्येक वर्षी या कार्यक्रमात पुणेकर नागरिकांचा वाढता सहभाग ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. यावर्षीच्या उपक्रमांमधून सात लाखांहून अधिक नागरिकांना लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. आमच्या ‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याबद्दल तसेच नागरिकांमध्ये अग्नी सुरक्षेविषयी जागृती करण्याच्या मोहिमेत आम्हाला सहकार्य केल्याबद्दल ‘पीएमसी’ आणि ‘पीसीएमसी’ अग्निशामक विभागाचे आम्ही आभार मानतो.’

हनीवेल इंडियाचे अध्यक्ष विकास चढ्ढा म्हणाले, ‘हनीवेलकडे अनेक दशकांचा फायर सेफ्टी अनुभव आहे. आमच्या जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानामुळे आणि स्थानिक पातळीवरील ज्ञानामुळे कुटुंबे आणि घरे सुरक्षित राहू शकत आहेत. ‘सेफ किड्स अ‍ॅट होम’ कार्यक्रमाच्या पाठीशी राहिल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समुदायांचे सुरक्षिततेबाबत ज्ञान, वर्तन आणि स्वभाव बदलत आहे.’

प्रत्येक वर्षी आयोजित केल्या जाणार्‍या राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहाचा उद्देश कर्तव्य बजावत असताना प्राण गमवावे लागणार्‍या अग्नीशामक कर्मचार्‍यांना अभिवादन तसेच आगीपासून सुरक्षित राहण्याची जागरुकता निर्माण करणे हा असतो.

‘सेफ किड्स फाउंडेशन’विषय :
‘सेफ किड्स फाउंडेशन’ २००६मध्ये ‘सेफ किड्स वर्ल्डवाईड’चा सदस्य बनले आणि त्यांच्याच भागिदारीतून भारतातील लहान मुलांचे जीवन अधिक सुखकर बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे फाउंडेशन विना नफा संघटना, सरकार आणि शाळांसोबत काम करून अपघातामुळे उद्भवणारे मृत्यू आणि दुखापतींविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करते, जे टाळता येणे शक्य आहे. फाउंडेशनने रस्ता सुरक्षेबाबत व्यापक आणि प्रशंसनीय कार्य केले आहे. ‘फेडेक्स’द्वारे प्रायोजित सुरक्षित मुले ‘या मार्गाने पायी चाला’ हा पादचारी सुरक्षा कार्यक्रम, मुंबईमध्ये २००७मध्ये लहान मुलांसाठी चालताना होणाऱ्या जखमांना तोंड देण्यासाठी सुरू करण्यात आले.

२००९मध्ये दिल्ली आणि २०१०मध्ये अहमदाबाद या दोन अतिरिक्त शहरांमध्ये हा कार्यक्रम पुढे विस्तारला गेला आहे. २००७ ते २०१६पर्यंत, तीन हजारांपेक्षा जास्त शाळा आणि जवळजवळ ४.५दशलक्ष मुलांपर्यंत पोहोचलेले शैक्षणिक उपक्रम, या शहरांतील मुलांसाठी रस्ते सुरक्षा सुधारण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. नोव्हेंबर २०१५मध्ये पुण्यात हनीवेल प्रायोजित ‘सेफ किड्स अॅट होम’ कार्यक्रम सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश आग आणि भाजण्यामुळे होणाऱ्या जखमा कमी करणे आणि जीवघेण्या जखमा होण्यास प्रतिबंध करणे आहे.

अधिक माहितीसाठी : www.safekidsfoundation.org
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZTOBN
Similar Posts
‘आधारकार्ड अभियाना’ची मोहिम महिनाभर वाढविण्याची मागणी पिंपरी : महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय ‘आधार नोंदणी व दुरुस्ती विशेष अभियान’ राबविण्यात आले होते.  नागरिकांच्या सोईसाठी ही मुदत महिनाभर वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.  या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय पुणे : ‘मंत्रिमंडळाच्या १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण, शिक्षणसंस्था वाहनांची संख्या तसेच गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी
पिंपरी-चिंचवड येथे रक्तदान शिबिर पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, ‘अरविंद एज्युकेशन’च्या श्रीमती आरती, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, बबनराव शितोळे,
‘‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन’ पुणे : ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्‍वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. ‘रिंगरोड’, ‘मेट्रो’, ‘टीपी स्कीम’ या प्रकल्पांमुळे महानगर क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढणार आहे,’ अशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language